अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये
अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करू नये
***********
भोकर मध्ये बिरसा मुंडा समितीचे निवेदन
**********
भोकर (तालुका प्रतिनिधी) अनुसूचित जमातीच्या यादीत धनगर समाजाचा समावेश करू नये असे निवेदन भोकर येथे उपविभागीय अधिकाऱ्यांना बिरसा मुंडा सामाजिक विकास समितीच्या वतीने 26 सप्टेंबर रोजी देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील40 वर्षापासून धनगर समाज आम्ही अनुसूचित जमाती मधील धनगड आहोत असा प्रयत्न करीत आहेत मोर्चे आंदोलने न्यायालयीन लढाई सुद्धा झाली न्यायालयीन प्रक्रियेत मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवला असे असताना केवळ राजकीय स्वार्थापोटी दबाव गट निर्माण करून धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्याबाबत शासन स्तरावर हालचाली होताना दिसत आहेत त्यामुळे आदिवासी समाजात सरकार विषयी असंतोष पसरला आहे या विरोधात आदिवासी समाज रस्त्यावर उतरून विरोध करणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले असून निवेदनावर बिरसा मुंडा विकास समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक माझळकर, उपाध्यक्ष पुंजाजी डोखळे दामेश्वर माजळकर, पुंडलिकराव वागतकर, सखाराम भिसे, किशन वागतकर, मारुती खूपसे, परमेश्वर वागतकर, सुभाष खूपसे, मारुती भिसे साहेबराव खूपसे, विनोद बोरकर, श्रीराम खरोडे, वाकोडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत