अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीर तर्फे नाट्य रसिकांना किर्तावणी नाटकाची मेजवानी
'वारी आडवाटंच्या विठोबाची : कीर्तावणी' तून उलगडणार !

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीर तर्फे नाट्य रसिकांना किर्तावणी नाटकाची मेजवानी
‘वारी आडवाटंच्या विठोबाची : कीर्तावणी’ तून उलगडणार !
उदगीर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीर तर्फे किर्तावणी नाटकाचा प्रयोग दि. ०६ डिसेंबर २०२५ वार शनिवार रोजी सायंकाळी ०५:३० वा. उदगीर येथील उदयगिरी नेत्र रुग्णालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. मराठी संस्कृतीचा मूलाधार असलेल्या वारकरी संप्रदायाचा केवळ भावनिक आणि भक्तिमय पैलूच नव्हे, तर त्याचा सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक विचारधारेवरील सखोल प्रभाव यावर प्रकाश टाकणारा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम उदगीर शहरात होत आहे.

‘कीर्तावणी’ हे केवळ नाटक नसून, महाराष्ट्रातील दोन प्रमुख लोककला ‘कीर्तन’ आणि ‘लावणी’ याचा सर्जनशील मिलाफ आहे. या प्रयोगातून ‘वारी आडवाटंच्या विठोबाची’ कथा मांडली जाते. भक्ती आणि परमार्थापलीकडे जाऊन संतसाहित्याने महाराष्ट्राला दिलेली सामाजिक दिशा आणि या सगळ्याचा आपल्या वर्तमान जीवनावर काय परिणाम होतो, याचा विचार ‘कीर्तावणी’तून नव्याने मांडण्यात येत आहे. या प्रयोगाचे लेखन-दिग्दर्शन ऋचिका खोत यांचे असून अभिनय ऋचिका खोत आणि स्वामीराज भिसे करत आहेत. या नाटकाच्या सादरीकरणाचा आनंद घेण्यासाठी रसिक श्रोत्यांनी सहकुटुंब उपस्थित रहावे असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, उदगीर शाखेचे अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष प्रा. महेश बसपुरे, उपाध्यक्ष अश्विनी निवर्गी, कार्यवाह प्रा. डॉ. गौरव जेवळीकर व इतर पदाधिकारी आयोजकांनी केले आहे.













































