सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

स्वामी आई संस्थेच्या वस्तू प्रदर्शन व आनंदनगरीला प्रतिसाद

स्वामी आई संस्थेच्या वस्तू प्रदर्शन व आनंदनगरीला प्रतिसाद

मानवत सौ ममता चिद्रवार : मानवत येथील स्वामी आई सेवाभावी संस्थेद्वारा 23 मार्च रोजी नाटकेश्वर मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या वस्तू प्रदर्शन आणि आनंद नगरी कार्यक्रमास महिलांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्षा राणीताई लाड व प्रेरणाताई वरपूडकर यांची उपस्थिती होती. सेवाभावी संस्थे च्या अध्यक्षा सविता कत्रुवार आणि राणी लाड यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.
सविता कत्रुवार यांच्या हस्ते राणी लाड याना मानाची साडी देऊन तसेच प्रेरणाताई वरपूडकर यांना नववर्षाची गुढी देऊन सत्कार करण्यात आला.
वस्तू प्रदर्शन व आनंद नगरी मध्ये 30 महिलांनी सहभाग नोंदवला. त्या प्रत्येक महिलांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवाभावी संस्थेच्या सचिव सिद्धलक्ष्मी गुंडाळे यांनी केले.
महिलां तर्फे वेगवेगळ्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात आले, प्रथमच मानवत मध्ये असे प्रदर्शन मांडण्यात आले. स्टॉल व आनंदनगरीचा अस्वाद प्रत्येक महिलांनी व मुलांनी घेतला.
कार्यक्रमाला संस्थेच्या उपाध्यक्ष माधुरी कत्रुवार, प्रणिता उपलंचेवार, उपसचिव अमृता रतकंठवार, कोषाध्यक्ष दीपा मोदी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button