शेकापकडून सौ.आशाताई शिंदे भव्य शक्तिप्रदर्शन करत आज उमेदवारी अर्ज दाखल करणार
शेकापकडून सौ.आशाताई शिंदे भव्य शक्तिप्रदर्शन करत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार
लोहा प्रतिनिधी : लोहा 88 विधानसभा मतदारसंघातून शेतकरी कामगार पक्षाकडून सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर शिंदे ह्या दि. 29 ऑक्टोबर रोजी भव्य शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
मंगळवारी दि. 29 रोजी लोहा शहरातील शनी मंदिर येथून भव्य रॅलीस प्रारंभ होणार असून ही रॅली तहसील कार्यालयासमोर येणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आशाताई यांची शहरातील सहारा मैदान येथे भव्य जाहीर सभा होणार आहे. या जाहीर सभेला माजी आमदार शामसुंदर शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत दादा शिंदे सह आदी मान्यवर संबोधित करणार आहेत.
आशाताई शिंदे यांचा उमेदवारी फॉर्म भरण्यासाठी लोहा व कंधार तालुक्यातील शेकापच्या महिला भगिनी हजारो कार्यकर्ते उपस्थित राहणार असून या जाहीर सभेला मतदारसंघातील महिला भगिनी कार्यकर्ते पदाधिकारी यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी कामगार पक्षाच्यावतीने करण्यात आले आहे.