विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचारी प्रशिक्षणाला सुरुवात
विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचारी प्रशिक्षणाला सुरुवात
वसमत… प्रतिनिधी…
विधानसभा निवडणुकीसाठी कर्मचारी प्रशिक्षणाला सुरुवात
वसमत विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून प्रशासनातर्फे विविध स्तरांवर कामकाजाची धावपळ दिसुन येत आहे. एकीकडे उमेदवार नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची 29 तारीख जवळ येत आहे. शनिवार व रविवारी सुट्टीमुळे उमेदवारी अर्ज दाखल होणार नाहीत. त्यामुळे या दोन दिवसात कर्मचाऱ्यांना निवडणूक प्रशिक्षण देण्याचे प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. शनिवार व रविवारी सकाळ व दुपार अशा दोन सत्रामध्ये या प्रशिक्षणाला काल शनिवारी सकाळी सुरुवात झाली.
पहिल्या सत्रात निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री विकास माने यांनी पीपीटीच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी श्री खुशालसिंह परदेशी यांनीही उपस्थितांना मार्गदर्शक सुचना केल्या व कर्मचाऱ्यांनी कुठलाही तणाव न घेता प्रशिक्षण पुर्ण करुन मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया जबाबदारीने पार पाडावी असे आवाहन केले.
यावेळी तहसीलदार मॅडम सौ. शारदा दळवी यांनी उपस्थितांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे दिली व सर्व उपस्थितांचे आभार मानले. यानंतर सदरील कर्मचाऱ्यांना मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले व मतदान यंत्रावर प्रत्यक्ष मतदान कसे करुन घ्यायचे आहे याबद्दल सुचना व मार्गदर्शन करण्यात आले. सदरील प्रशिक्षण सुरमणी दत्ता चौगुले सांस्कृतिक सभागृह येथे तर प्रात्यक्षिक बहिर्जी स्मारक विद्यालय येथे आयोजित करण्यात आले. दोन दिवस दोन सत्रात प्रत्येकी 400 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रशिक्षण कार्यक्रमासाठी महसुल विभाग, कृषी विभाग, नगरपरिषद विभाग, सहकार विभाग, शाळा व महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते. निवडणूक प्रक्रिया यथायोग्य पार पाडण्यासाठी प्रशासन सर्व स्तरावर सज्ज होत आहे.