विद्यापीठ युवक महोत्सवात बहिर्जी महाविद्यालयाचे घवघवीत यश
विद्यापीठ युवक महोत्सवात बहिर्जी महाविद्यालयाचे घवघवीत यश
वसमत. प्रतिनिधी. दि 22 आक्टोबर
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड व सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन विष्णुपुरी, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने दि 18 ते 21 ऑक्टो 2024 या कालवधीत आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या युवक महोत्सवात येथील बहिर्जी स्मारक महाविद्यालयाने घवघवीत यश संपादन केले आहे. आंबेडकरी जलसा या सांघिक व मृदमुर्ती कला या वैयक्तिक स्पर्धेसाठी तृतीय पारितोषिक मिळाले आहे. प्राचार्य डॉ एम एम जाधव , सांस्कृतिक विभागाचे डॉ सुभाष क्षीरसागर, डॉ व्ही टी नरवाडे, डॉ शेख राजिया, डॉ नागराज मगरे व संगीत विभागाचे प्रा. परवरे यांच्या मार्गदर्शना खाली आंबेडकरी जलसा मध्ये क्रांती मुंजप्पा विर, पायल बोडखे, संस्कृती शिंदे, श्रध्दा मोरे, ऋतुजा सुर्यतळ, शिवराणी शिंदे, अनिकेत सोनटक्के, भुजंग मुलगीर, सुबोध भुसावळ यांनी सहभाग नोंदविला. तर मृदमुर्तीकला मध्ये वामन कदम या विद्यार्थ्याने यश संपादन केले.
या सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला दोन पारिषोतिक मिळून दिल्याबदल संस्थेचे उपाध्यक्ष माजी आमदार, ॲड मुंजाजीराव जाधव, श्री पंडितराव सारंग, प्राचार्य डॉ एम एम जाधव, संघप्रमुख यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा आज महाविद्यालयात सत्कार करण्यात आला . या वेळी प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या यशाबद्दल विद्यार्थी व संघप्रमुख यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.