वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त वारकरी दिंडी व संतसंमेलन
वारकरी साहित्य परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त वारकरी दिंडी व संतसंमेलन
****************
भोकर( तालुका प्रतिनिधी)
संतांचे विचार सर्वसामान्य पर्यंत पोहोचविण्यासाठी व संत साहित्याचा प्रसार प्रचार करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या वारकरी साहित्य परिषदेचा 13 वा वर्धापन दिन 11 नोव्हेंबर 2024 रोजी हदगाव येथे उत्साहाच्या वातावरणात पार पडला.
प्रारंभी शहरातून भजन दिंडी नाम घोष करीत काढण्यात आली त्यानंतर महादेव मठ संस्थान येथे वैभव महाराज यांच्या अध्यक्षतेखाली संत संमेलन पार पडले यावेळी भागवत महाराज,अभिषेक महाराज,भुजंग महाराज,सुधाकर महाराज,वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष महाजन महाराज,जिल्हा उपाध्यक्ष बी.आर.पांचाळ यांनी वारकरी साहित्य परिषदेच्या कार्याविषयी विचार मांडून गावा गावात हरिपाठ झाला पाहिजे वारकरी साहित्य व संत साहित्याचे विचार पोहोचला पाहिजे आपण सर्वांनी महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष विठ्ठल काकाजी पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून वारकरी साहित्य परिषदेचे कार्य जोमाने वाढवले पाहिजे असे विचार मांडले या कार्यक्रमास वारकरी साहित्य परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष जनाबाई खराने,उपाध्यक्ष जय नंदाताई चामले,समन्वयक एल. एन.कदम,कानबा राव हराळे,ज्ञानेश्वर माऊली,धोंडजी महाराज,प्रकाश कलाने वचेवार ताई यांच्यासह महिला पुरुष वारकरी मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचालन सुधाकर महाराज यांनी केले पसायदान व आरतीने कार्यक्रमाची सांगता झाली त्यानंतर महाप्रसाद करण्यात आला