Homeआपला महाराष्ट्रनिवडणूकराजकारण
वसमत विधानसभेसाठी आज एक नामांकन दाखल
वसमत विधानसभेसाठी आज एक नामांकन दाखल
वसमत….. प्रतिनिधी…..
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली असून वसमत विधानसभेसाठी आज एक नामांकन प्राप्त झाले असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी श्री विकास माने यांनी दिली आहे. श्री जगन्नाथ लिंबाजी अडकिणे यांनी आज आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे.काल दिनांक 22 आक्टोबर पासुन अर्ज विक्री सुरू झाली असून काल 21 संभाव्य उमेदवारासाठी एकुण 43 तर आज दिनांक 23 आक्टोबर रोजी 16 संभाव्य उमेदवारासाठी एकुण 30 अर्जाची विक्री झाली असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.सध्या विविध पक्ष व उमेदवार यांच्या तर्फे अर्ज खरेदी सुरू असुन येणाऱ्या काही मुहुर्तावर अर्ज दाखल केले जाऊ शकतात व त्यानंतर विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची संख्या लक्षात येऊ शकते. यावेळी वसमत विधानसभेसाठी पंचरंगी सामना रंगणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.