सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रसरकारी योजना

वसमत तालुक्यातील बियर बार आज बंद…..

वसमत तालुक्यातील बियर बार आज बंद…..

वसमत …. प्रतिनिधी…..

महाराष्ट्र सरकारच्या “VAT TAX” धोरणाचा जाहीर निषेध FI3 (परमिट रुम/बिअरबार) मधील मद्य विक्रीवर महाराष्ट्र शासनाने VAT च्या नावाखाली लादलेला 10 टक्के टर्न ओव्हर टॅक्स आणि दरवर्षी भरमसाठ होणारी परवाना नूतनीकरण फी रद्द करणे तसेच मद्यविक्रीतून शासनाचा महसूल वाढण्यासाठी मद्य निर्मितीवर FIRST POINT TAX लागू करण्याच्या आग्रही मागणीसाठी
मद्यविक्री बंद आंदोलन गुरुवार, दि. २० मार्च २०२५ रोजी करण्यात येणार आहे. या बाबत आज वसमत तालुक्यातील सर्व वाईनबार असोसिएशन ची बैठक शासकीय विश्रामगृह वसमत येथे घेण्यात आली.
कुठल्याही करवाढीचा फटका ग्राहकालाच होत असतो. आपणही शासनाला जागे करण्यासाठी या आंदोलनात मोठ्या संख्येने सामील व्हा असे आवाहन वसमत तालुका वाईन बार असोसिएशन चा वतीने करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे मद्य प्रेमींची अडचण झाली तरी सहकार्य करावे असे आवाहनही केले आहे.
या बैठकीत वसमत तालुक्यातील सर्व वाईनबार दि.20 मार्च गुरुवारी रोजी एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . या बैठकीस वसमत तालुका वाईन बार असोसिएशन सदस्य गणेश काळे, जैस्वाल, जुक्ती, त्रिमल्ले, सावंत, चव्हाण यांच्या सह इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button