वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड यांना मतदारांचा प्रतिसाद
वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड यांना मतदारांचा प्रतिसाद
***********
(भोकर ता.प्रतिनिधी) 85 भोकर विधानसभा मतदार संघाचे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेश राठोड यांना ग्रामीण भागात मतदारांचा प्रतिसाद मिळत असून बहुजन विचारांशी एकत्र येऊन ग्रामीण भागात मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
भोकर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश राठोड यांनी ग्रामीण भागातील सर्व गावे वाडी तांड्यावर जाऊन मतदारांशी संवाद साधला आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजाच्या सर्व प्रतिनिधींना सत्तेत सहभागी होण्यासाठी संधी दिली असून आपणास भोकर मधून त्यांनी उमेदवारी दिल्याने बहुजन समाजातील मतदारांनी मोठा विश्वास व्यक्त केला आहे घराणेशाही व धन दांडगे उमेदवार या मतदारसंघात असून जनतेने मात्र आता बदल करण्याचे ठरवले आहे बहुजनांनी केवळ मतदानच करत राहायचे आहे का त्यांना सत्तेमध्ये वाटा कधी मिळणार आहे जेवढ्या प्रमाणात बहुजन ओबीसींची संख्या आहे तेवढ्या प्रमाणात सत्तेमध्ये सुद्धा त्यांना वाटा मिळाला पाहिजे असेही मत त्यांनी व्यक्त केले असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना पाठबळ द्यावे असे आवाहन मराठवाडा उपाध्यक्ष केशव मुद्देवाड, जिल्हा अध्यक्ष राजेश्वर हत्तीआंबिरे, तालुका अध्यक्ष दिलीपराव, सुभाष तेले, माणिक जाधव, अशोक राठोड, रमेश राठोड, आनंद एडके, प्रसाद शहाणे, भागाजी जाधव, बंजारा सेवा दलाचे सुरेश राठोड यांनी केले आहे नांदा, खडकी, बेंद्री, धारजणी ,डौर, आदि ठिकाणी सभा घेण्यात आल्या