सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
आपला महाराष्ट्रधार्मिक वार्तासामाजिक कार्य

लोह्यात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला आजपासून प्रारंभ

लोह्यात श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला आजपासून प्रारंभ

लोहा (प्रतिनिधी): लोहा शहरात आजपासून सात दिवसीय श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला सुरुवात होत आहे. हा सोहळा दि. ४ एप्रिल २०२५ ते दि. १० एप्रिल २०२५ या कालावधीत लक्ष्मीराज सुपरमार्केट, स्टेट बँकेच्या पाठीमागे, माऊली निवास येथे आयोजित करण्यात आला आहे.

या धार्मिक कार्यक्रमात भागवताचार्य हभप सखाराम महाराज पालमकर आपल्या रसाळ वाणीतून श्रीमद्भागवत कथाचे सुमधुर प्रवचन सादर करणार आहेत. कथा दररोज दुपारी १ ते ४ या वेळेत होणार असून, भाविकांना आध्यात्मिक ज्ञानाचा लाभ घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

या सोहळ्याचा समारोप दि. १० एप्रिल रोजी गुरुवारी शर्करा तुला कार्यक्रमाने होणार आहे. हा कार्यक्रम सकाळी १० वाजता संत मंडळींच्या पावन उपस्थितीत पार पडेल. लक्ष्मीकांत नरसिंह बच्चेवार व सौ. विमलताई लक्ष्मीकांत बच्चेवार यांच्या तुला भरण्याचा (शर्करा तुला) कार्यक्रम यानिमित्ताने संपन्न होईल.

या पवित्र आणि भक्तिमय सोहळ्यास सर्व नागरिकांनी सहपरिवार उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक लक्ष्मीकांत नरसिंह बच्चेवार व त्यांच्या परिवाराने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button