Homeआपला महाराष्ट्रनिवडणूकराजकारणलोकसभा
लोकसभा व विधानसभा मतदान प्रकिया सुरळीत पार पाडावी — जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
लोकसभा व विधानसभा मतदान प्रकिया सुरळीत पार पाडावी — जिल्हाधिकारी अभिजीत राऊत
लोकसभा व विधानसभा निवडणूका २५ वर्षा नंतर एकत्रित होत आहेत या दोन्ही निवडणूकीत मतदान प्रकिया सुरळीत पार पाडावी
काही अडचणी असतील त्याचे निरासरण करून घ्यावे निवडणूक आयोग बदल करत असते त्याची माहिती जाणून घ्यावी नेमून दिलेली जबाबदारी व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पडावी हलगर्जीपणा करू नये असे अहवान जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे
लोहा विधानसभा मतदार दोन हजार कर्मचाऱ्यांचे २६ व २७ या दोन दिवशी प्रशिक्षण संपन्न होत आहे लोहा शहरातील के के मंगल कार्यालय विश्रामगृहा समोर शनिवारी सकाळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी कर्मचारी प्रशिक्षण केंद्राला भेट दिली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, सहाय्यक निवडणूक अधिकार तहसीलदार विठ्ठल परळीकर कंधार तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी रामेश्वर गोरे निवडणूक अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांची उपस्थिती होती
जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी प्रशिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, निवडणूक प्रकिया सुरळीत पार पाडावी नियुक्त कर्मचा-यांनी काळजीपूर्वक काम करावे. २५ वर्षा नंतर लोकसभा-विधानसभा निवडणूक एकत्रित होत आहे. त्यामूळे एक अधिकारी अधिकचा देण्यात आलेला आहे. मी आठ नऊ वेळ काम केले असे म्हणून दुर्लक्ष करू नका. काळजीपूर्वक काम करावे निवडनुक आयोग बदल करते त्यामूळे मी पूर्वी काम केले मला माहिती आहे आता प्रशिक्षण घ्यायची गरज नाही असे म्हणून नका .येत नसेल तर विचार प्रश्नोत्तरे असावीत जेन्स करून त्यातील माहिती कळेल असे सांगून जलद मतदान कस होईल यासाठी काळजी घ्यावी असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी केले. नियोजन तसेच कामकाज पाहून जिल्हाधिकारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार व टीमचे अभिनंदन केले
लोहा विधानसभा निवडणुक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले सूचना दिल्या. सहायक निवडणूक अधिकारी तहसीलदार परळीकर निवडणूक निर्णय, तहसीलदार गोरे, मुख्याधिकारी लालगे यांनी प्रशिक्षण दिले, कर्मचाऱ्यांच्या शंकाचे समस्यांचे निराकरण केले.
नायब तहसीलदार सर्व श्री संदीप हाडगे, नायब तहसीलदार श्रीमती उर्मिला कुलकर्णी रेखा चामणार, अशोक मोकले, नंदू भोसिकर, राजेश पाठक, विनोद पावडे, नागार्जुन खैरे, यु इ मुद्दीराज तसेच. तलाठी परमेश्वर जाधव भुमेश्वर विभूते, सहायक महसूल अधिकारी राऊत, सिद्धार्थ गायकवाड, महूसल अधिकारी, राजेश गायंगी श्रिनिवास ढगे, तिरूपती मुंगरे, निवडणूक समन्वयक ईश्वर धुळगंडे,मन्मथ थोटे, अशोक मोरे,महेंद्र कांबळे, बी.बी.शेख. विलास चव्हाण, सूर्यकांत पांचाळ, दयानंद मळगे, मुनींत गायकवाड, यासह सर्व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.
गैरहजर कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करू
———————–
निवडणूकीचे काम हे राष्ट्रीय कर्तव्य आहे आदेशित सर्व कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घ्यावे.गैरहजर राहू नये प्रशिक्षण स्थळी उपस्थिती नोंद घेण्यात येते त्यामुळे गैरहजर राहण्या कर्मचाऱ्यांवर कार्यवाही करू असा इशारा निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांनी दिला आहे
URL Copied