सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्रक्राईम वार्ताग्रामीण वार्ता

मानवतला डीपीला शॉर्ट सर्किट ने लागली आग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

मानवतला डीपीला शॉर्ट सर्किट ने लागली आग कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेने अनर्थ टळला

मानवत तालुका प्रतिनिधी : शहरातील बसस्टँड समोरील गोलाईतनगरला विद्युत पुरवठा करणाऱ्या डीपीला शॉर्ट सर्किटने आग लागल्याची घटना गुरुवारी ता २२ सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली . नागरिकांच्या सतर्कतेने विजमंडळाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवून वीज पुरवठा सुरळीत केला .
याबाबत माहिती अशी की , गुरुवारी ता २२ सायंकाळी शहरातील बसस्टँड समोरील डीपीतील ट्रान्सफर मधून ऑइल लिक होऊन शॉर्टसर्किट झाल्याने अचानक पेट घेतला . डीपीच्या खाली कचरा असल्याने आग वाढली . त्या भागातील नागरिकांनी विजमंडळाच्या कर्मचाऱ्यांना फोन करून माहिती दिली . कर्मचारी दुर्गादास उन्हाळे , संतोष लोखंडे , शेख बाबर , दीपक सोरेकर व विशाल जाधव यांनी तात्काळ त्या भागातील वीजपुरवठा बंद करून घटनास्थळी धाव घेत पाण्याच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळवले . व वीजपुरवठा सुरळीत केल्याने इतर अनर्थ टळला .

डीपी झाल्या जुन्या शहरातील अनेक भागात असलेल्या वीजपुरवठा करणाऱ्या डीपी ह्या जुन्या झाल्या असून ट्रान्सफॉर्मर मधून ऑइल गळती होत आहे . तसेच फ्यूज तार टाकायला तांब्याच्या तार ऐवजी अल्युमिनियम च्या तार टाकल्या जात असल्याने असे प्रकार होत असल्याचे समजते . वीज मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी वर्गानी याकडे लक्ष देण्याची गरज आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button