Homeआपला महाराष्ट्रनिवडणूकराजकारण
माजी खा.प्रताप पा चिखलीकर, प्रा पुरुषोत्तम धोंडगे याचे सोमवारी शक्तिप्रदर्शन
#निवडणूक तडका
एकनाथ पवार यांची विधानसभा उमेदवारी ठाकरे गटाकडून दाखल
माजी खा.प्रताप पा चिखलीकर, प्रा पुरुषोत्तम धोंडगे याचे सोमवारी शक्तिप्रदर्शन
लोहा प्रतिनिधी
लोहा विधानसभा मतदार संघात शुक्रवारी शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने एकनाथ पवार यांनी यांनी उमेद्वारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे सादर केला.
आतापर्यंत ४१ जणांनी ९० नामांकन पत्र खरेदी केले आहेत. आता पर्यंत पाच अर्ज दाखल झाले आहेत सोमवारी माजी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे, हे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी सादर करणार आहेत
२९ ऑक्टोबर नामर्निदेशन दाखल करण्याची अंतिम तारिख असून शनिवार रविवार दोन दिवस सुट्टया आहेत त्यामूळे तर उर्वरित दोन दिवसात गर्दी होणार असे दिसते, शिवसेना उबाठा पक्षाच्या वतीने एकनाथ पवार यांनी नामांकन निवडवूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे वाखल केले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी ऍड ईश्वरराव भोसीकर, ऍड. मुक्तेश्वर धोंडगे , काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार कंधार,माजी उपनगराध्यक्ष मन्नान चौधरी, माजी सभापती बालाजी पाडांगळे उपस्थित होते.
माजी खा चिखलीकर , प्रा पुरुषोत्तम धोंडगे सोमवारी नामांकन भरणार आहे. प्रतापराव पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस (शप) कडून उमेदवारी दाखल करणार आहेत .ग्रामीण रुग्णालयाच्या समोर पवार जिनिग येथून मिरवणूक निघणार आहे .प्रा डॉ पुरुषोत्तम धोंडगे हे अपक्ष उमेदवारी दाखल करणार आहेत. त्यांना मराठा योद्धा जरांगे पाटील यांचे समर्थन आहे अस सांगण्यात आले
तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्ष
———————–
नामनिर्देशन दाखल करण्यासाठी कक्ष तयार करण्यात. तलाठी परमेश्वर जाधव भुमेश्वर विभूते , ए पी कासले, श्रीनिवास ढगे, श्री पांडागळे, ज्योती बाऱ्हाळ कर, रायेवार, शहाजी निकम, आसुलकर, ताडीकोंडलवार, निखिल सुंदरगिरवाड, सहायक महसूल अधिकारी राऊत, सिद्धार्थ गायकवाड, महूसल अधिकारी, राजेश गायंगी श्रिनिवास ढगे, तिरूपती मुंगरे, निवडणूक समन्वयक ईश्वर धुळगंडे, मन्मथ थोटे, अशोक मोरे, महेंद्र कांबळे, बी.बी.शेख. विलास चव्हाण, सूर्यकांत पांचाळ, दयानंद मळगे, मुनींत गायकवाड, यासह कर्मचारी सहकार्य करत आहेत