महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ द्या आ. रोहित पवार
महाविकास आघाडीच्या उमेदवाराला साथ द्या — आ. रोहित पवार
उदगीर प्रतिनिधी : उदगीर विधानसभा मतदार संघात दोन वेळा निवडून आलेले व आता महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले माजी आ. सुधाकर भालेराव यांना विजयी करण्याचे आवाहन आ. रोहित पवार यांनी केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार सुधाकर भालेराव यांनी मंगळवारी भव्य मिरवणुकीने उमेदवारी अर्ज दाखल
केला . सायंकाळी नगर परिषद व्यापारी संकुल समोरिल प्रांगणात आ. रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत जाहीर सभा झाली .यावेळी व्यासपीठावर खा. डॉ. शिवाजी काळगे, उमेदवार सुधाकर भालेराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बस्वराज पाटील नागराळकर, प्रा. शिवाजी मुळे, जिल्हाध्यक्ष संजय शेटे, माजी नगराध्यक्षा उषाताई कांबळे, जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा शिलाताई पाटील, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव हुडे, राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे प्रदेश सरचिटणीस चंदन पाटील नागराळकर, जळकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मारोती पांडे, सभापती प्रिती भोसले,जिल्हा बँकेच्या संचालिका लक्ष्मीताई भोसले, काँग्रेसचे शहराध्यक्ष मंजुरखों पठाण, कल्याण पाटील, ज्ञानेश्वर पाटील, अॅड. पद्माकर उगीले, इश्वर समगे, डॉ. रवी मुळे, अजय शेटकार, अजीम दायमी, अमोल भालेराव, बालाजी पाटील, डॉ. अंजुम खादरी, अरुणा लेंडाणे, चंद्रप्रकाश खटके, गजानन सताळकर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोल ताना आ. रोहित पवार म्हणाले की, राज्यातील महायुती सरकार हे टक्केवारीचे सरकार असुन या सरकारच्या काळात सर्वसामान्य माणसाला न्याय मिळाला नाही. असे सांगुन आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहीण योजना चालुच ठेवणार आहे .शिवाय या रकमेत वाढ करणार असल्याचे आ. पवार म्हणाले . खा. डॉ. शिवाजी काळगे म्हणाले की, माझ्या विजयात उदगीरकरांचाही मोठा वाटा असुन निवडुन आल्यानंतर लोकसभेमध्ये उदगीरकरांच्या जिव्हाळयाचा दुध भुकटी प्रकल्पाचा विषय मांडला या प्रकल्पाला न्याय देण्याचा मी विडा उचलला असुन येणाऱ्या काळात दुध डेअरी प्रकल्प सुरु करण्यासाठी आपला प्रयत्न राहणार असल्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे आभार मंजुरखा पठाण यांनी केले.