महाराष्ट्र ग्राहक समितीमार्फत आदर्श पुरस्कार वितरण समारंभ…
महाराष्ट्र ग्राहक समितीमार्फत आदर्श पुरस्कार वितरण समारंभ…
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही मोहोळ तालुका जिल्हा सोलापूर येथे ग्राहक समितीमार्फत विविध क्षेत्रातील व्यक्तींचा राज्यस्तरीय आदर्श गौरव पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर सागर गुडमेवार पुण्यावरून उपस्थित होते.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन सेवानिवृत्त डी. वाय. एस. पी. सूर्यकांत पाटील यांच्या शुभहस्ते दीप प्रज्वलनाने होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली. कोल्हापूरच्या सौ. रोहिणी अमोल पराडकर, पुण्याचे डॉ. सागर गुडमेवार, मोहोळच्या सौ. सुलोचना पाटील, सोलापूरच्या कु. प्रियांका जगझाप, यांना साहित्य शिरोमणी पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रमुख पाहुणे म्हणून सौ. रोहिणी अमोल पराडकर व श्री अमोल पराडकर, विमलाताई माळी, मंगला मोरे, प्रदेश अध्यक्ष तानाजीराव गुंड सतीश बुरगुटे प्रदेश युवक कार्याध्यक्ष तात्या रोडे अन्सार शेख उपस्थित होते.
संस्थापक प्रदेशाध्यक्ष तानाजीराव गुंड यांनी प्रस्तावना केली उद्घाटक सूर्यकांत पाटील यांनी संस्थेच्या कामाची तसेच विविध स्तरावर विशेष कार्य केलेल्या व्यक्तींची पण प्रशंसा केली प्रमुख अतिथी सौ रोहिणी पराडकर यांनी ग्राहक समिती कशी स्थापन झाली व त्याचे कार्य कसे चालतं याबद्दल मार्गदर्शन केलं स्टेज वरील मान्यवरांचे स्वागत करून विविध क्षेत्रातील 50 राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळ्यात सुरुवात झाली व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्री अमोल पराडकर विमलाताई माळी स्मिता पाटील उपस्थित होते हा सोहळा कैलासवासी शहाजीराव पाटील सभागृह मोहोळ येथे संपन्न झाला या कार्यक्रमाला विविध भागातून श्रोते आले होते आभार प्रदर्शन संतोष कोल्हार यांनी व्यक्त केले.