महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या – प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे
~~~~~~~~~~~~~~
भोकर मध्ये भाजपाची भव्य महायुती विजय संकल्प रॅली
:::::::::::::::::::::
भोकर ( तालुका प्रतिनिधी) मागील 40 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास केंद्रातील मोदी सरकार व महाराष्ट्रातील महायुती सरकारने केला गरिबांचा विकास, रस्ते विकास,पाणी अशा विविध विकासाची कामे झाली असून महाराष्ट्राला विकासाकडे नेण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भोकर येथे महायुतीच्या उमेदवार एड.श्रीजया ताई चव्हाण यांच्या भव्य विजय संकल्प रॅली नंतर झालेल्या सभेत बोलताना केले.
भोकर शहरात महायुतीच्या उमेदवार ऍड. श्री जया ताई चव्हाण यांच्या प्रचारार्थ भव्य अशी विजय संकल्प रॅली 27 ऑक्टोबर रोजी काढण्यात आली होती त्यानंतर जी.प.हायस्कूलच्या मैदानावर घेण्यात आलेल्या सभेत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले कै.शंकरराव चव्हाणांनी जलक्रांती केली,अशोकराव चव्हाण यांनी देखील तोच वारसा पुढे नेत मोठ्या प्रमाणावर विकासाची कामे केली आता यापुढे श्री जया चव्हाण सुद्धा त्याच पावलावर पाऊल टाकून काम करणार आहेत महाविकास आघाडी सत्ते करिता निवडणूक लढवीत आहे तर महायुती विकासाकरिता निवडणूक लढवीत आहे लाडकी बहीण योजना बंद करा अशी मागणी काँग्रेस कडून होत आहे सदर योजना पुढील पाच वर्ष चालू राहील असे सांगून उद्धव ठाकरे अकार्यक्षम मुख्यमंत्री राहिले त्यांच्या काळात फक्त दोन दिवस ते मंत्रालयात आले उद्धव ठाकरे हिंदुत्व सोडून काँग्रेसच्या घरी जाऊन बसत आहेत महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार असा विश्वासही त्यांनी शेवटी व्यक्त केला. पालकमंत्री गिरीश महाजन यावेळी बोलताना म्हणाले भोकर मधील आजची विजय रॅली रेकॉर्ड ब्रेक झाली अशोकराव चव्हाण यांनी जो विक्रम केला तोच विक्रम श्री जया ताई देखील करतील चव्हाण यांची तिसरी पिढी आज राजकारणात येत असून त्यांनी विकासाचे ध्येय समोर ठेवले आहे
काँग्रेसच्या जाचा मुळेच पक्ष बदलला- खा.चव्हाण
****************
काँग्रेसमध्ये असताना माझ्या विरुद्ध षडयंत्र रचण्यात येत होते म्हणूनच त्यांच्या जाचाला कंटाळून आपण पक्ष बदलला आहे सध्या भोकर विधानसभा मतदारसंघात खेळखंडोबा चालू आहे उपद्रव्याप करण्याचे काम देखील करत आहेत मतदारांनी सतर्क रहावे कुणालाही वाटते आमदार व्हावं पण विधानसभेच्या सभागृहात जाण ही बाब एवढी सोपी नाही तिथे प्रश्न मांडावे लागतात महायुती सरकारच्या काळात सर्वसामान्यांसाठी अनेक योजना आल्या श्रीजया आता निवडणूक रिंगणात असून तुम्ही सर्वांनी तिला आशीर्वाद द्या कै.शंकरराव चव्हाण यांनी या भागात विकासाचा पाया रचला माझं जीवन भोकरच्या विकासासाठी समर्पित केलेला आहे या मतदारसंघाचा कायापालट करायचा आहे म्हणून मतदारांनी विकासासाठी महायुती सरकारला भक्कम पाठबळ द्यावं असेही खा.अशोकराव चव्हाण यांनी मत मांडले ते म्हणाले
भोकरचा विकास हाच माझा ध्यास- एड.श्रीजया चव्हाण
*********
महायुतीकडून भोकर विधानसभा मतदार संघात मला उमेदवारी दिली याबद्दल मी आभार मानते असे सांगून भाजपा महायुतीच्या उमेदवार एड. श्री जयाताई चव्हाण म्हणाल्या या भागातील जनतेने चव्हाण कुटुंबीयांवर मोठे प्रेम केलेले आहे कै.शंकररावजी चव्हाण यांनी या भागाचा मोठा विकास केला त्यानंतर खा.अशोकराव चव्हाण अमिता चव्हाण,यांनी देखील विकासाची कामे केली हे पाहून मला फार मोठा स्वाभिमान वाटतो आणखी खूप विकास या भागाचा करायचा आहे शिक्षण,युवकांना रोजगार,महिलांना मदत अशी सकारात्मक भावना ठेवून बदल करायचा आहे महायुती सरकारच्या अनेक योजना सर्वसामान्य लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरलेल्या आहेत मी तुमची सर्वांची लेक नात बहीण असून मला तुमच्या सर्वांसाठीच विकासाचे काम करायचे आहे असे भावनिक गौरवोद्गार श्रीजया चव्हाण यांनी काढले या सभेत सचिन साठे, माजी आ.भीमराव केराम, विक्रम काळे, जिल्हाध्यक्ष एड.किशोर देशमुख, बापूराव गजभारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले या सभेस मा.आमदार राजेश पवार, अमरनाथ राजूरकर, राम पाटील रातोळीकर, मारुती कवळे गुरुजी, गोविंदराव नागेलीकर, प्रवीण साले, चैतन्य बापू देशमुख,आनंद बोंढारकर, दिलीपराव धर्माधिकारी आदींची उपस्थिती होती सूत्रसंचालन रामचंद्र मुसळे यांनी केले तर आभार गणेश पाटील कापसे यांनी मानले