मक्तेदारी दूर करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा- सुजात आंबेडकर
मक्तेदारी दूर करून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा- सुजात आंबेडकर
****************
भोकर (तालुका प्रतिनिधी) भोकर विधानसभा मतदार संघ ही कुण्या एकट्याची मक्तेदारी नाही,मक्तेदारी दूर करून सर्वसामान्यांच्या हितासाठी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक सुजातजी आंबेडकर यांनी भोकर येथील प्रचार सभेत बोलताना केले.
भोकर येथे 14 नोव्हेंबर रोजी जि.प. हायस्कूलच्या मैदानावर वंचित बहुजन आघाडीचे भोकर विधानसभेचे उमेदवार सुरेश राठोड यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना सुजातजी आंबेडकर पुढे म्हणाले तेलंगणा मधून गाड्या काँग्रेसच्या प्रचारासाठी येताना मला दिसल्या अशोकराव चव्हाण हे आज जरी भाजपामध्ये असले तरी काँग्रेसचे रिमोट कंट्रोल आहेत काँग्रेसचे उमेदवार तिरुपती कोंडेकर हे मॅनेज उमेदवार आहेत त्यांना मतदान करू नका,दिग्गज नेते पुढारी आपल्यावर राज्य करीत आहेत आपण त्यांचे गुलाम झालो आहोत त्यांची तिसरी पिढी राजकारणात येत आहे आपली मुलं मात्र अजूनही बेकार आहेत वंचित बहुजन आघाडीने सर्वसामान्य जातीतील लोकांना उमेदवारी दिली इतर पक्षांनी मात्र विशिष्ट समाजालाच निवडून आणले प्रस्थापितांना बाजूला सारून आपल्या हक्काची सत्ता आणण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार एड.अविनाश भोशीकर,भोकर विधानसभेचे उमेदवार सुरेश राठोड यांना निवडून देण्याचे आवाहनही शेवटी त्यांनी केले. यावेळी एड.,अविनाश भोशीकर, राजेश्वर बनसोड, राजेश्वर हत्ती आंबिरे, शेख रहीम, विधानसभेचे उमेदवार सुरेश राठोड, आदींनी विचार मांडले प्रसाद शहाणे,आनंद एडके,सुभाष तेले ,अशोक राठोड,दिलीप राव,गणपत जाधव यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते