भोकर येथे वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक सुजातभाऊ आंबेडकर यांची 15 नोव्हेंबर रोजी सभा
भोकर येथे वंचित बहुजन आघाडीचे स्टार प्रचारक सुजातभाऊ आंबेडकर यांची 15 नोव्हेंबर रोजी सभा
***********
भोकर( तालुका प्रतिनिधी) भोकर विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश भाऊ राठोड यांच्या प्रचारार्थ स्टार प्रचारक सुजात भाऊ आंबेडकर यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे
भोकर विधानसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश भाऊ राठोड यांनी प्रचारात घेतला असून गाव गावामध्ये जाऊन त्यांनी पक्षाची भूमिका मांडली आहे बहुजन समाजाला न्याय देण्यासाठी एड. बाळासाहेब आंबेडकर यांनी बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय दिला आहे भोकर विधानसभा मतदार संघात बहुजन समाज मोठ्या प्रमाणावर असून राठोड यांच्या प्रचारार्थ गावा गावातून साथ मिळत आहे बहुजनांना सत्ता मिळाले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून भूमिका मांडण्यात येत आहे 15 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता सुजाता भाऊ आंबेडकर यांची सभा होणार असून मराठवाडा उपाध्यक्ष बनसोड जिल्हाध्यक्ष राजेश्वर हत्ती आंबिरे यांच्या उपस्थितीत सभा होणार असून या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन तालुका अध्यक्ष दिलीपराव यांनी केले आहे