भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांची बदली: हिंगोलीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची भोकरला नियुक्ती

भोकर येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांची बदली: हिंगोलीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची भोकरला नियुक्ती
********
भोकर (तालुका प्रतिनिधी) येथील अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांची हिंगोली येथे बदली झाली असून हिंगोलीच्या अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना भोकर येथे नियुक्ती देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडनुकीच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत राज्यातील 83 अप्पर पोलीस अधीक्षक व अतिरिक्त पोलीस अधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत भोकर येथे मागील 3 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारचे काम करणारे अधिकारी डॉ. खंडेराव धरणे यांनी अनेक गुन्ह्यामध्ये आरोपींना जेरबंद केले, अनेक मोठ्या गुन्ह्यांचा तपासाचा शोध त्यांनी केला. भोकर येथून त्यांची बदली हिंगोली येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून करण्यात आली तर हिंगोलीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांची बदली भोकर येथेअप्पर पोलीस अधीक्षक म्हणून झाली आहे.