भोकर मध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
भोकर मध्ये काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर यांचे जोरदार शक्ती प्रदर्शन
********
भव्य रॅली आणि सभेला चांगला प्रतिसाद: उमेदवारी दाखल
**************
भोकर (तालुका प्रतिनिधी) काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करताना शहरात रॅली काढून भव्य शक्ती प्रदर्शन केले यावेळी मोठ्या संख्येने ग्रामीण भागातील कार्यकर्ते उपस्थित होते सभेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला.
29 ऑक्टोबर रोजी काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार तिरुपती पाटील कोंडेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तत्पूर्वी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौकातून वाजत गाजत भव्य मिरवणूक निघाली मिरवणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर महिला पुरुष युवक सहभागी झाले होते भव्य प्रमाणात निघालेल्या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधले होते युवकांनी यावेळेस वाजंत्री च्या तालावर जल्लोष केला कार्यकर्त्यांनी देखील उत्साह पूर्ण वातावरणात जल्लोष केला व घोषणा दिल्या त्यानंतर व्यंकटेश टॉकीज च्या मैदानावर भव्य सभा झाली माजी मंत्री डॉ.माधवराव किन्हाळकर यांनी भाजप सरकारविरुद्ध कडाडून टीका केली, लोकसभेचे उमेदवार प्रा.रवींद्र चव्हाण,अब्दुल सत्तार,बबनराव बारसे, बाळासाहेब पा. रावणगावकर, गोविंद बाबा गौड पाटील,सुभाष पा.किन्हाळकर, बालाजी गाडे, सुभाष पा.कोळगावकर, दादाराव ढगे,हत्तीआंबिरे, अप्पाराव राठोड,सुरेखा माळे,कैलास गोडसे,शिवलीला कानडे,सुभाष लोने, तौसीफ इनामदार,आदिनी मनोगत व्यक्त करून भाजपा सरकारवर कडाडून टीका केली महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून देऊन इतिहास घडवा असे आवाहन केले
मी मॅनेज उमेदवार नाही माझ्या रक्तात बेईमानी नाही
****************
“काँग्रेस पक्षामध्ये आपण गेली दहा वर्षापासून निष्ठेने काम केले आहे पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली याबाबत आभार मानून पुढे बोलताना तिरुपती पाटील कोंडेकर म्हणाले माझी मॅनेज उमेदवार म्हणून चर्चा सुरू करण्यात आलेली आहे ज्या पक्षात नेते मोठे झाले मंत्रीपद मुख्यमंत्री पद भूषविले त्यांनी पक्षाशी गद्दारी केली अनेक निष्कलंक लोक संपवले त्याचा बदला मीच घेणार आहे मी खानदानी माणूस आहे आमच्या रक्तात बेईमानी नाही कुठल्याच दबावाला पैशाला बळी पडणारा मी नाही मी मरेपर्यंत मॅनेज होणार नाही तुमच्या सेवेसाठी काम करत राहील असे भावनिक उद्गार कोंडेकर यांनी यावेळी काढताच टाळ्यांचा कडकडाट झाला