प्रिती जयस्वाल यांचा काँग्रेसला रामराम. वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.
प्रिती जयस्वाल यांचा काँग्रेसला रामराम. वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश.
वसमत/प्रतिनिधी वसमत येथील काँग्रेसच्या महिला पदाधिकारी प्रिती जयस्वाल यांनी आज मोठा निर्णय घेत काँग्रेस पक्षाला रामराम ठोकून वंचित बहुजन आघाडी मध्ये श्री प्रकाश आंबेडकर यांच्या उपस्थितीत प्रवेश घेतला. यावेळी वंचित बहुजन आघाडी तर्फे त्यांची वसमत विधानसभेसाठी उमेदवारी सुध्दा जाहीर करण्यात आली.
वसमत तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांमध्ये त्या धडाडीच्या महिला नेत्या म्हणून परिचित होत्या. प्रदेश पातळीवर महिला सरचिटणीस म्हणून त्यांनी काम केले आहे. काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. मागील अनेक दिवसांपासून त्या विधानसभेसाठी इच्छुक होत्या पण आघाडी मध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला सुटली आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री प्रकाश आंबेडकर यांनी त्यांना वसमत विधानसभेसाठी एबी फार्म दिला आहे. पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणूक लढविणार आहेत.