प्रचंड शक्तीप्रदर्शनाने महायुतीचे उमेदवार ना. संजय बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
प्रचंड शक्तीप्रदर्शनाने महायुतीचे उमेदवार ना. संजय बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल
उदगीर : हजारोंचा जनसमुदाय सहभागी असलेल्या भव्यदिव्य रॅली द्वारे, शहरातील नागरिकांना अभिवादन करीत राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री ना. संजय बनसोडे यांनी महायुतीकडून प्रचंड शक्तीप्रदर्शनाने सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री ना. संजय बनसोडे हे महायुतीकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याने सकाळ पासूनच नागरिकांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात गर्दी करण्यासाठी सुरुवात केली. रॅलीला सुरुवात होण्यापूर्वी ना. बनसोडे यांनी उदागिर बाबांच्या किल्ल्यात जाऊन दर्शन घेतले. त्यांनतर खाजा बाशा दर्गा, श्री हावगीस्वामी महाराज मठ, श्री शंकरलिंग महाराज मठ संस्थान, विश्वशांती बुद्ध विहार आदी ठिकाणी जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शिल्पा बनसोडे, माजी आमदार गोविंद केंद्रे, माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे,भाजपाचे राहुल केंद्रे, रामचंद्र तिरुके, चंदर अण्णा वैजापूरे, मकरंद सावे, प्रशांत पाटील, भरत चामले, मुन्ना पाटील, शिवशंकर धुप्पे, अफसर बाबा शेख, उत्तराताई कलबुर्गे, दीपाली औटे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष अमोल निडवदे, सुधीर भोसले,मनोज पुदाले, डॉ. कल्पना किनीकर, अमोल अनकल्ले, राष्ट्रवादीचे सय्यद जानिमिया, बालाजी भोसले, समीर शेख, सेनेचे ऍड. गुलाब पटवारी, महानंदा सोनटक्के, प्रीति पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा, शिवसेना,रिपाइं व घटक पक्षाचे कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सकाळपासून मतदार संघातील नागरिकांची लगबग सुरू झाली. टप्याटप्याने महिला पुरुष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात जमा होऊ लागले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करून भव्यदिव्य रॅलीला सुरुवात झाली.
रॅली जसजशी पुढे सरकू लागली तशी तशी रॅलीमध्ये प्रचंड गर्दी वाढत होती. रॅलीतील पहिला टप्पा छत्रपती शिवाजी महाराज चौकात आलेला असताना शेवटचा रॅलीचा टप्पा लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात होता.उदयगिरी महाविद्यालय ते छत्रपती शाहू महाराज चौकापर्यंत सहा तास रस्ता फुलून गेला होता. हातात पक्षाचे झेंडे घेवून वाजत गाजत रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौकात आली.यावेळी महायुतीच्या नेत्यांनी आजची रॅली पाहता ही विजयाची नांदी ठरणार असल्याचे सांगितले.
महायुतीचे उमेदवार क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी मतदारांना आशीर्वाद कायम पाठीशी खंबीरपणे असावा अशी अपेक्षा व्यक्त केली. आभार प्रदर्शन प्रा. प्रवीण भोळे यांनी केले.
माजी मंत्री आ. निलंगेकर यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल –!
माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. लातूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होणार असल्याचे माजी मंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी माध्यमांसमोर बोलताना स्पष्ट केले.