सूचना: "एकमुख" न्यूज पोर्टल कुठल्याही जाहिरातीची पुष्टी करत नाही. कृपया पडताळणी करूनच कोणतेही व्यवहार करा. आम्ही केवळ माहिती पुरवतो, व्यवहारांची जबाबदारी वाचकाची आहे.
Homeआपला महाराष्ट्र

पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला : लोह्यात उद्या सर्वपक्षीय बंदचे आवाहन

निर्घृण हत्येचा तीव्र निषेध, व्यापाऱ्यांचे सहकार्य

पहलगाममध्ये आतंकवादी हल्ला : लोह्यात उद्या सर्वपक्षीय बंदचे आवाहन

निर्घृण हत्येचा तीव्र निषेध, व्यापाऱ्यांचे सहकार्य

लोहा (ता. २५ एप्रिल): जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी धर्म विचारून केलेल्या अंधाधुंध गोळीबारात पंचवीसहून अधिक निष्पाप पर्यटकांचा बळी गेला. या अमानुष घटनेच्या तीव्र निषेधार्थ उद्या शनिवारी (ता. २६ एप्रिल) लोहा शहरात सर्वपक्षीय बंदचे आवाहन करण्यात आले आहे. तहसीलदार यांना निवेदन देऊन व्यापाऱ्यांनी व जनतेने शांततेत बंद पाळण्याचे आवाहन केले आहे.

या पार्श्वभूमीवर लोह्यातील सर्व पक्षीय नेते, व्यापारी संघटना, सामाजिक संघटना, शाळा व ट्युशन संस्था यांच्यावतीने शहर बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पहलगाममधील निर्घृण हल्ल्याने संपूर्ण देश हादरला असून, या हल्ल्यामुळे जनतेमध्ये तीव्र संतापाची भावना आहे.

लोह्यात तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनावर माजी उपनगराध्यक्ष केशवराव मुकदम, भाजप उत्तर मंडळाध्यक्ष शरद पवार, काँग्रेसचे माजी शिक्षण सभापती संजय पाटील कऱ्हाळे, शिवसेना (उबाठा) प्रमुख सुरेश हिलाल, शिक्षक नेते हरिभाऊ चव्हाण, मारुती पाटील बोरगावकर, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नामदेव कटकमवार, लोहा आर्य वैश्य समाज अध्यक्ष दिनेश तेललवार, राम पाटील, सुधाकर पाटील आदींच्या सह्या आहेत.

सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र येऊन दिलेल्या या बंद आवाहनाला शहरातील व्यापाऱ्यांनीही प्रतिसाद देत शांततेत बंद यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button