चीदगिरी फाट्याजवळ कारने शाळकरी मुलास उडवले
चीदगिरी फाट्याजवळ कारने शाळकरी मुलास उडवले
**************
मुलगा गंभीर जखमी: कारच्या झाल्या चिंधड्या
**********
आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्सला डिझेल वेळेवर मिळाले नाही
***********
भोकर (तालुका प्रतिनिधी) भोकर नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील चिदगिरी फाट्याजवळ झालेल्या अपघातात भरधाव वेगात येणाऱ्या कारणे शाळकरी मुलास जोरात धडक दिल्याने शाळकरी मुलगा गंभीर जखमी झाला कार झाडावर जाऊन आदळली आणि रोडच्या खाली जाऊन कारचा चंदामेंदा झाला सदर घटना 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4 वाजता च्या दरम्यान घडली.
याबाबत माहिती अशी की भोकर नांदेड राष्ट्रीय महामार्गावर चिदगिरी फाट्याजवळ भोकरहून नांदेड कडे भरधाव वेगात जाणारी कार एम एच 08 झेड 94 20 ह्या कारणे दहाव्या वर्गात शिकणारा शाळकरी मुलगा सौहार्द अशोक पांचाळ रा. भोशी हा सायकलवर येत असताना त्यास उडवले मुलाला गंभीर मार लागला असून पायाचे फ्रॅक्चर झाले व डोक्याला देखील गंभीर मार लागला आहे ते असं नांदेड रुग्णालयात नेण्यात आले अपघात झाल्यानंतर कार एका झाडावर आदळून झाडाला तोडून रोडच्या बाजूला खाली जाऊन चक्काचूर झाली
जि.प. आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्सला डिझेल नाही
**************
सदर गंभीर अपघात होताच प्राथमिक आरोग्य केंद्र भुशी येथील आरोग्य केंद्रातील ॲम्बुलन्स मागवण्यात आली होती पण सदर ॲम्बुलन्स मध्ये डिझेल नसल्याने अर्ध्या तासाचा वेळ लागला अपघात झाल्यानंतर तात्काळ सेवेसाठी ॲम्बुलन्स ठेवण्यात आली आहे मात्र सदर ॲम्बुलन्स ला डिझेलची व्यवस्था का करण्यात आली नाही,? डिझेल टाकून का ठेवण्यात येत नाही?डिझेल नसल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो?या अपघाताच्या वेळी डिझेल नसल्यामुळे ॲम्बुलन्स काढण्यासाठी उशीर झाल्याने आरोग्य केंद्राच्या गलथानकाराबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे गंभीर लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे