के. के.एम. च्या मानवता वार्षिक अंकाला स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेडचा प्रथम पुरस्कार
के. के.एम. च्या मानवता वार्षिक अंकाला स्वा.रा.ती.म. विद्यापीठ नांदेडचा प्रथम पुरस्कार
मानवत : येथील के.के.एम. महाविद्यालयाच्या मानवता या वार्षिकांकास स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड च्या वतीने विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट वार्षिक अंकास प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी एकूण 250 महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता.
के. के एम महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध विषयावर आधारित मानवता हा वार्षिक अंक प्रसिद्ध करण्यात येतो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य, संशोधक वृत्ती विकसित व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपादक मंडळात प्राध्यापक व विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. 2023-24 या शैक्षणिक वर्षात लोकशाही समोरील आव्हाने या विषयावर विशेष अंक प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध मुद्द्यावर आधारित अभ्यासपूर्ण पद्धतीने लोकशाही समोरील आव्हाने मांडली. यामध्ये विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेमधील लेखाचा समावेश आहे.
महाविद्यालयाच्या यापूर्वी प्रकाशित मानवता अंकास सलग तीन वर्षे प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. मानवता या अंकाचे संपादक महाविद्यालययाचे प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे, कार्यकारी संपादक प्रा. डॉ.पंडित लांडगे, सदस्य डॉ.सचिन चोबे, डॉ. पवन पाटील यांनी मानवता अंकाचे काम पाहिले. अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे डॉ. दुर्गेश रवंदे यांचेही मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळल्याबद्दल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रुवार, सचिव बालकिशनजी चांडक, उपाध्यक्ष अनिलराव नखाते, कोषाध्यक्ष रामचंद्रराव कत्रुवार, सहसचिव विजयकुमार दलाल, संचालक दिलीपराव हिबारे व संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांनी संशोधन विध्यार्थी आणि संपादक मंडळाचे अभिनंदन केले .