आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते अपक्ष उमेदवार भीमराव दुधारे यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद
आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ कार्यकर्ते अपक्ष उमेदवार भीमराव दुधारे यांच्या प्रचाराला मतदारांचा प्रतिसाद
****************
भोकर( तालुका प्रतिनिधी) तालुक्यातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते भीमराव दुधारे हे भोकर विधानसभा मतदार संघात अपक्ष उमेदवार असून त्यांनी ग्रामीण भाग पिंजून काढला आहे मतदारांमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
भोकर विधानसभा क्षेत्रातील मुदखेड अर्धापूर भोकर तालुक्यात भीमराव दुधारे यांनी प्रचाराची दुसरी फेरी पूर्ण केली असून मी सर्व सामान्य कुटुंबातील एक चळवळीचा कार्यकर्ता आहे गेले 40 वर्षापासून आंबेडकरी विचारांचा पाईक असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार समाजात रुजविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो आहे भोकर मतदार संघात आजपर्यंत आपण अनेक पुढार्यांनाच मोठे केले आहे मात्र सर्वसामान्य बहुजन विचाराचा व्यक्तींना सत्तेमध्ये स्थान मिळाले नाही सत्ता आपल्या हाती आल्याशिवाय आपले प्रश्न मिटणार नाही म्हणून आता आपल्या माणसाला सत्तेत पाठवा तुमच्यासाठी सदैव सेवेत राहणार असून मला मतदान करून आशीर्वाद सर्वांनी द्यावे असे आवाहन त्यांनी गावागावातून केले आहे मतदारांमधून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे