अलोट..अभूतपूर्व .मतदारांची.. गर्दी . उत्साह … …दहा वर्षानंतर माजी खा. चिखलीकरांचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल….
अलोट..अभूतपूर्व .मतदारांची.. गर्दी . उत्साह … …दहा वर्षानंतर माजी खा. चिखलीकरांचे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी दाखल….
——————-
लोहा प्रतिनिधी : लोहा विधानसभा मतदार संघात दहा वर्षानंतर हर्ष उल्हासात ..अलोट.. अभूतपूर्व.. मतदारांची गर्दी …असा वातावरणात .. माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी शक्ती प्रदर्शन करत लोहा विधानसभा मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.
उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारती समोरील मैदानावर मिरवणुकीपूर्वी जाहीर सभा झाली. विधानसभा मतदार संघातील मतदाराच्या अलोट गर्दीने मैदान भरले होते..सगळीकडे माणसंच माणसं होती…लाडक्या बहिणीची लक्षणीय उपस्थिती होती. आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धर्माधिकारी, व्यासपीठावर उमेदवार माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपाचे श्रावण पाटील भिलवंडे, माजी नगराध्यक्ष कल्याणराव सूर्यवंशी, चैतन्यबापू देशमुख भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रवीण पाटील चिखलीकर, भाजपा जिल्हाध्यक्ष देशमुख, प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे पिरिप प्रदेश उपाध्यक्ष बाबुराव गजभारे, रिपाई चे जिल्हाध्यक्ष मिलिंद शिराढोणकार,माणिकराव मुकदम, केरबाजी बिडवई आनंदराव शिंदे, सचिन पाटील चिखलीकर शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे, किरण वट्टमवार, केशवराव मुकदम, करिम शेख, छत्रपती धुतमल, मिलिंद पवार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, बाबुराव गिरे, नरेंद्र गायकवाड, शोभाताई बगडे,भाजपा जिल्हाध्यक्षा चित्रारेखा गोरे यासह मान्यवर उपस्थित होते.
उपस्थित सभेला संबोधित करताना प्रतापराव पाटील म्हणाले, की राजकीय संघर्ष माझ्या आयुष्यला कायम पुंजलेला आहे.त्यामुळेच मला पक्ष बदलावे लागत आहेत. मी पुढील निवडणुकीत राहील अथवा न राहील पण येथील जनतेनी मला नेहमीच तळहातासारखे। जपले आहे. पक्ष बदलला तरीतुमची साथ नेहमीच राहिली आहे.देशाच्या सर्वोच्च सभागृहात गेले तो केवळ तुमच्यामुळेच. लोहा कंधार माझे कुटुंब आहे .आपल्या सुखदुःखात आम्ही नेहमीच सहभागी होतो.
कोण काय बोलते याकडे लक्ष देऊ नका वीस दिवस डोळ्यात तेल घालून दक्ष रहा. पंतप्रधान मोदी, राज्य सरकारने ज्या योजना राबविल्या त्या लोकांपर्यंत न्याव्यात. तसेच लाडकी बहिणी योजनेचा लाभ सर्व बहिणींना मिळत आहेत काँग्रेसचे सरकार आले तर ही योजना बंद होईल तेव्हा सर्वांनी मतदान महायुतीला करावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या “घडी” ला मतदान करावे असे आवाहन प्रतापरावां यांनी केले.यावेळी वसंत सुगवे धर्माधिकारी बापूराव गजभारे, प्राणिताताई देवरे, वारकड गुरुजी, यासह मान्यवरांची भाषणे केले संचलन भास्कर पवार, बी डी जाधव यांनी केले निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार यांच्याकडे प्रतापराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला सोबत माजी नगराध्यक्ष कल्याणराव सुर्यवंशी वसंत सुगावे, माणिकराव मुकादम करीम शेख, आनंदराव पाटील उपस्थित होते